मंगळवार, २९ मार्च, २०११

लाडकी बाहली होती माझी एक ---शांता ज. शेळके

लाडकी बाहली होती माझी एक


मिळणार तशी ना शोधूनी दुसरया लाख

किती  गोरी गोरी गाल गुलाबच फुलले

हासती केस ते  सुंदर  काळे कुरळे

झाकती उघडती निळे हासरे डोळे

अन ओठ जसे की आताच खुदकन हसले

अंगात शोभला झगा रेशमी लाल

केसांवर फुलले  लाल  फितीचे फुल

कितीतरी बाहुल्या  होत्या  माझ्याजवळी

पण तीच सोनुली फार मला आवडली

मी गेले  तीजसह माळावर खेळाया

मी लपनू  म्हणते  साई सटु टा हो या या

 किती शोध शोधली परी कुठे न ती दिसली

परतले  घरी मी होउन   हिरमुसलेली

स्वनात तीने  मम रोज एकदा यावे

हलवून मला हळु माळावरती नयावे

वाटते सारखे तयाच ठिकाणी

शोधुनी पहावी पुन्हा पुन्हा  ती चिमणी
जाणार कशी पण सतंत पाउस धार

खल मुळी न तिजला  वारा झोंबे  फर

पाऊस उघडता गेले  माळावरती

गवतावर ओलया मजला सापडली ती

कुणी गेली होती गाय तडुवूनी  तिजला

पाहुनी  दशा ती रडूच आले  मजला

मैत्रिणी   म्हणाल्या  काय आहे हे ध्यान

केसांच्या झिपर्या रंग हि गेला उडून
परी आवडली ती तशीच मजला राणी

लाडकी बाहली होती माझी म्हणुनी
                                                           शांता ज. शेळके
 

मंगळवार, २२ मार्च, २०११

पिपांत मेले ओल्या उंदिर - बा.सी.मर्ढेकर

पिपांत मेले ओल्या उंदिर - बा.सी.मर्ढेकर



पिपांत मेले ओल्या उंदिर;

माना पडल्या, मुरगळल्याविण;

ओठांवरती ओठ मिळाले;

माना पडल्या, आसक्तीविण.

गरिब बिचारे बिळांत जगले,

पिपांत मेले उचकी देउन;

दिवस सांडला घाऱ्या डोळीं

गात्रलिंग अन धुऊन घेउन.



जगायची पण सक्ती आहे;

मरायची पण सक्ती आहे.



उदासतेला जहरी डोळे,

काचेचे पण;

मधाळ पोळें

ओठांवरती जमलें तेंही

बेकलाइटी, बेकलाइटी!

ओठांवरती ओठ लागले;

पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!
                               
                         --   बा.सी.मर्ढेकर

तू तेव्हा तशी. तू तेव्हा अशी -सुरेश भट.

तू तेव्हा तशी. तू तेव्हा अशी --सुरेश भट


तू माझ्या आयुष्याची पहाट॥
तू माझ्या कॆफ़ाची मत्त लाट..

तू मागील जन्मांची आर्त साद..
तू मानसकुंजातील वेणू नाद..

तू माझ्या एकांताचा प्रकाश..
तू माझ्या गीतांचा बाहुपाश..

तू माझ्या दु:खाची चांदरात..
तू माझ्या स्वप्नांचा पारिजात..

तू अम्रुतभासांचा अंग राग..
तू विझल्या नयनांचा दीप राग..

तू माझ्या जगण्याची वाटचाल..
तू माझ्या रक्ताचा रंग लाल..

तू माझ्या असण्याचा अंश अंश..
तू माझ्या नसण्याचा मधुर दंश..
                                   
                                       -सुरेश भट.





लाजून हासणे अन्‌ -- मंगेश पाडगांवकर

लाजून हासणे अन्‌     

लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा ?
मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा ?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे

हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ?
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे !
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे

जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा
देशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे

                              -मंगेश पाडगांवकर







एकदा केंव्हा तरी -- -मंगेश पाडगांवकर


एकदा केंव्हा तरी     -- -मंगेश पाडगांवकर

एकदा केंव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण
काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा.

मग लक्षात येतं की,

आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात् खाल्लेली नाही.
जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही.
चटक्यांच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण
परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे.

कॅलिडोस्कोप पाह्यलेला नाही.
सर्कस मधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही.
तसच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्म ही राह्यलेला नाही.
कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला “बाळपणीचा काळ सुखाचा”
स्वतः बरोबर कधी नेला ते आपल्याला कळलंच नाही.

आता त्या ट्रिप्स नाहीत.
दोन दोन मुलांच्या जोड्या करुन चालणं नाही.
विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत.
प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही….

त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले.
त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं.
म्हणूनच ती अजुनही उडू शकते.
आपण अजून जमिनीवरच आहोत॥

                         -मंगेश पाडगांवकर

शुक्रवार, १८ मार्च, २०११

आजीचे घडाळ ------केशवकुमार

आजीचे घडाळ

आजीच्या जवळी घडाळ कसले आहे चमत्कारिक ,
दई ठेवूनि ते कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
तयाची टिक टिक चालते न कधीही , आहे मुके वाटते ,
किल्ली दई न तयास ती कधी, तरी ते सारखे चालते


" अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे राती बिछ्यान्यावरी
साडेपाचही वाजतात न कु ठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोबडा, उठ की !"
                                                    ---केशवकुमार

ताईची करण्यास जममत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनीया सकाळ न मुळी पत्ता कधी लागता !
"आली ओटीवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानी तो घणघणा घंटा ध्वनी आदळे.


खेळाचया अगदी भरांत गढुनी जाता आम्ही अंगणी
हो केव्हा तीनसांजा ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले "खेळ पुरे , घरातं परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"


आजीला बिलगून ऐकत बसु जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात की रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतीवरी वाजावया चौघडा


सांगे वेळ, तशाच वार- तिथीही आजी घडाळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला तयातुनी
मौजेचे असले घडाळ दडुनी कोठे तिने ठेविले ?
गाठोडे फडताळ शोधुनी तिचे आलो ! तरी ना मिळे !

                                                       ---केशवकुमार

रे हिंदबांधवा , थांब या सथळी - भा. रा. तांबे

रे हिंदबांधवा , थांब या सथळी -  भा. रा. तांबे



रे हिंदबांधवा, थांब या सथळी अशु दोन ढाळी,

ती पराकमाची जयोत मावळे इथे झांशीवाली ll ध ु ll

तांबेकुलवीरशी ती,

नेवाळकरांची कीर्ती ,

हिंदभूधवजा जणु जळती,

मदारनी राणी लकमीबाई मूत र महाकाली ll १ ll

घोडयावर खांदा  सवार,

हातात नंगी  तलवार,

खणखणा किरत ती वार,

गोयारची कोडी फोडित , पाडीत वीर इथे आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली ,

शत्रूंची  लषकरे थिजली ,

मग कीर्तीरूप  ती उरली,

ती हिंदभूमीच्या   , पराकमाची  इतिश्रीच    झाली ll ३ ll

मि ळतील इथे  शाहीर,

लविवतील माना वीर,

तर, झरे ढाळीतील नीर,

हा दगडां फु टतील िजभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll

                                                          -भा रा तांबे

बुधवार, १६ मार्च, २०११

ती फुलराणी - बालकवी

ती फुलराणी



हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात - अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फुलराणीला ?

पुरा विनोदी संध्यावात - डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला - चुंबून म्हणे फुलराणीला-
"छानी माझी सोनुकली ती - कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून - हळुच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा - आवडला अमुच्या राणींना ?"
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी !

आन्दोली संध्येच्या बसुनी - झोके झोके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल - नभी चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनी केला - चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते, निजले रान, - निजले प्राणी थोर लहान.
अजून जागी फुलराणि ही - आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा - काय जाहले फुलराणीला ?

या कुंजातुन त्या कुंजातुन - इवल्याश्या या दिवट्या लावुन,
मध्यरात्रिच्या निवान्त समयी - खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर - निर्झर गातो; त्या तालावर -
झुलुनि राहिले सगळे रान - स्वप्नसंगमी दंग होउन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ति - कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होउनी - स्वप्ने पाही मग फुलराणी -

"कुणी कुणाला आकाशात - प्रणयगायने होते गात;
हळुच मागुनी आले कोण - कुणी कुणा दे चुंबनदान !"
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति - विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता - वाऱ्यावरती फिरता फिरता -
हळूच आल्या उतरुन खाली - फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनी - त्या वदल्या ही अमुची राणी !

स्वर्गभूमीचा जुळ्वित हात - नाचनाचतो प्रभातवात;
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला - हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शान्ती - मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संशयजाल, - संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि - हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती - तरीहि अजुनी फुलराणी ती!


तेजोमय नव मंडप केला, - लख्ख पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळित मोती - दिव्य वर्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालुनी - हासत हासत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबि फेटा - झकमणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला - हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे - साध्या भोळ्या फुलराणीचे !

गाउ लागले मंगलपाठ - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, - वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला - भेटे रविकर फुलराणीला !

वधूवरांना दिव्य रवांनी, - कुणी गाइली मंगल गाणी;
त्यात कुणीसे गुंफित होते - परस्परांचे प्रेम ! अहा ते !
आणिक तेथिल वनदेवीही - दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी - फुलराणीची गोड कहाणी !
गुंतत गुंतत कवि त्या ठायी - स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला - नवगीतांनी फुलराणीला !
 
                                                                 - बालकवी


सोमवार, १४ मार्च, २०११

मग माझा जीव तुझ्या -- सुरेश भट


मग माझा जीव तुझ्या

दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले

वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली
अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर
तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल

जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल

जेंव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल            
                                                           - सुरेश भट

दवांत आलीस भल्या पहाटे - बा सी मर्ढेकर

दवांत आलीस भल्या पहाटे
दवांत आलीस भल्या पहाटी
शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा

अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस; - मागे
वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?

लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कैसा पारा!

अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!

तळहाताच्या नाजुक रेषा
कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन
शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!

दवांत आलिस भल्या पहाटी
अभ्राच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.
                                    - बा सी मर्ढेकर


बुधवार, ९ मार्च, २०११

पत्र - भाऊसाहेब पाटणकर

पत्र

पत्रे तिला प्रणयात आम्ही खुप होती धाडली,
धाडली आशी होती की नसतील कोणी धाडली

धाडली मजला तिने ही, काय मी सांगु तीचे
सव॔ ती माझीच होती, एकही नव्हते तीचे

पत्रात त्या जेव्हां तिचे ही पत्र हाती लागले
वाटले जैसे कोणाचे गाल हाती लागले

पत्रात त्या हाय ! तेथे काय ती लिहीते बघा
माकडा आरशात आपुला चेहरा थोडा बघा

साथ॔ता संबोधनाची आजही कळली मला
व्यर्थता या य़ौवनाची तिही आता कळाली मला

नाही तरिही धीर आम्ही सोडीला काही कुठे
ऐसे नव्हे की माकडाला, माकडी नसते कुठे
- भाऊसाहेब पाटणकर

सब घोडे बारा टक्के - विंदा करंदीकर

सब घोडे बारा टक्के

जितकी डोकी तितकी मते
जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट;
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!


गोड गोड जुन्या थापा
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार?
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के
सब घोडे बारा टक्के!


जिकडे सत्ता तिकडे पोळी
जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी)
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच वार
मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी;
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी;
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा;
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्ऱ्या कोणी छक्के;
सब घोडे बारा टक्के!
- विंदा करंदीकर

तक्ता - अरुण कोलटकर

तक्ता.

अननस, आई, इजार आणि ईडलिंबू
उखळ, ऊस आणि एडका
सगळे आपापले चौकोन संभाळून बसलेत

ऎरण, ओणवा, औषध आणि आंबा
कप, खटारा, गणपती आणि घर
सगळ्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जागा आहेत

चमचा, छत्री, जहाज आणि झबलं
टरबूज, ठसा, डबा, ढग आणि बाण
सगळे आपापल्या जागी ठाण मांडून बसलेत

तलवार, थडगं, दौत, धनुष्य आणि नळ
पतंग, फणस, बदक, भटजी आणि मका
यांचा एकमेकाला उपद्रव होण्याची शक्यता नाही

यज्ञ , रथ, लसूण, वहन आणि शहामृग
षटकोन, ससा, हरिण, कमळ आणि क्षत्रिय
या सगळयांनाच अढळपद मिळालंय

आई बाळाला उखळात घालणार नाही
भटजी बदकाला लसणाची फोडणी देणार नाही
टरबुजाला धडकून जहाज दुभंगणार नाही

शहामृग जोपर्यंत झबलं खात नाही
तोपर्यंत क्षत्रिय पण गणपतीच्या पोटात बाण मारणार नाही
आणि एडक्यानं ओणव्याला टक्कर दिली नाही
तर ओणव्याला थडग्यावर कप फोडायची काय गरजाय

- अरुण कोलटकर

मग माझा जीव तुझ्या - सुरेश भट

मग माझा जीव तुझ्या

दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले

वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली
अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर
तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल

जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल

जेंव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल
- सुरेश भट

बुधवार, २ मार्च, २०११

माझे जगणे होते गाणे - कुसुमाग्रज

माझे जगणे होते गाणे

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामाधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे
---कुसुमाग्रज

मंगळवार, १ मार्च, २०११

दुबळी माझी झोळी....ग. दि. माडगूळकर

दुबळी माझी झोळी

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,

हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी,
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी,

एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,

महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया,
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया,

गोठविनारा नको कडाका नको उन्हाचि होळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी..

होते तितुके देइ याहुन हट्ट नसे गा माझा,
सौख्य देइ वा दुःख ईश्वरा रंक करि वा राजा

अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.

---ग. दि. माडगूळकर

सकाळी उठोनी ..बा. सी.मर्ढेकर

सकाळी उठोनी | चहा-काँफी घ्यावी,
तशीच गाठावी| विज-गाड़ी||

दाती तृण घ्यावे | हुजूर म्हणून;
दुपारी भोजन| हेची सार्थ ||

संध्याकाळ होता | भूक लागे तरी,
पोराबाळांवरी | ओकू नये||

निद्रेच्या खोपटी | काळजीची बिळे,
होणार वाटोळे| होईल ते||

कुण्याच्या पायाचा | काही असो गुण;
आपुली आपण| बिडी प्यावी||

जिथे निघे धूर| तेथे आहे अग्नी;
आम्ही जमद्ग्नी | प्रेतरुपी||

                                    -----बा. सी.मर्ढेकर

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

सागर .. कुसुमाग्रज


  सागर

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे

निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे

मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो
त्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

दर्यावरची रंगीत मखमल उचलुन घेते कुणी
कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी

दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे

                                  - कुसुमाग्रज



गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०११

सखी मंद झाल्या तारका-- सुधीर मोघे .

सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ?


मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशिल का ?

हृदयात आहे प्रीत अन ओठांत आहे गीत ही
ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशिल का ?

जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरी ही उरे काही उणे, तू पूर्तता होशिल का ?

बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का ?

                                                      सुधीर मोघे .

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

हसलो म्हणजे...- संदीप खरे

हसलो म्हणजे...
हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे दु:खी नव्हतो ऐसे नाही

हसलो म्हणजे फक्त स्वत:च्या फजितीवर
निर्लज्यागत दिधली होती स्वत:च टाळी;
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही.

हसतो कारण तुच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहरयाला काही शोभत नाही;
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही.

हसतो कारण दुसऱ्यानाही बरे वाटते
हसतो कारण तुला सुद्धा ते 'खरे' वाटते;
हसलो म्हणजे फक्त दाखवली फुले कागदी
आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही.

हसतो कारण जरी बत्तिशी कुरुप आहे
खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे;
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही.
                           
                              कवी - संदीप खरे



मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०११

माझ्या मना बन दगड---विंदा करंदीकर

माझ्या मना बन दगड



हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको, डोळे शिव !
नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड !

हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे !
रडणा-या रडशील किती ?
झुरणा-या झुरशील किती ?
पिचणा-या पिचशील किती ?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो !

हा रस्ता अटळ आहे !
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत !
माणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य !
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद !

बन दगड आजपासून
काय अडेल तुझ्यावाचून
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी ?
काय तुझे हे निःश्वास
मरणा-याला देतील श्वास ?
आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे ?
आहे तेवढे दुःखच फार
माझ्या मना कर विचार
कर विचार हास रगड
माझ्या मना बन दगड

हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज !
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार !
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड

                     - विंदा करंदीकर



लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी--सुरेश भट

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
                                          -सुरेश भट




शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

तुतारी---- केशवसुत

तुतारी



एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकीन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजला आणुनी

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?

रुढी, जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने ह्या सावध व्हा तर!

चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!

घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्नतीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!

पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!

                            - केशवसुत



गुरुवार, १० फेब्रुवारी, २०११

अरे खोप्यामधी खोपा.....बहिणाबाई चौधरी

अरे खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं

            ............ बहिणाबाई चौधरी



तेच ते...- विंदा करंदीकर


तेच ते...
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते ! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते

खानावळीही बदलून पाहील्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार

सुख थोडे दु:ख फार
संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक, बुळा बोध
नऊ धगे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तीचा तोच रोग

तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती '
तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती '
तेच ओठ तेच डोळे
तेच मुरके तेच चाळे
तोच पलंग तीच नारी
सतार नव्हे एकतारी

करीन म्हटले आत्महत्त्या
रोमिओची आत्महत्त्या
दधीचिची आत्महत्त्या
आत्महत्त्याही तीच ती
आत्मा ही तोच तो
हत्त्याही तीच ती
कारण, जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते
              
                 - विंदा करंदीकर



बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

चुकली दिशा तरीही - विंदा करंदीकर

                चुकली दिशा तरीही
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे (न्या रे?)

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?

                                    - विंदा करंदीकर

एकदा ऐकले काहींसें असें---कुसुमाग्रज




एकदा ऐकले काहींसें असें

असीम अनंत विश्वाचे रण
त्यात हा पृथ्वीचा इवला कण
त्यांतला आशिया भारत त्यांत
छोट्याशा शहरीं छोट्या घरांत

घेऊन आडोसा कोणी 'मी' वसें
क्षुद्रता अहो ही अफाट असें!
भिंतीच्या त्रिकोनी जळ्मट जाळी
बांधून राहती कीटक कोळी

तैशीच सारी ही संसाररीती
आणिक तरीही अहंता किती?
परंतु वाटलें खरें का सारें?
क्षुद्र या देहांत जाणीव आहे
जिच्यात जगाची राणीव राहे!

कांचेच्या गोलांत बारीक तात
ओतीत रात्रीत प्रकाशधारा
तशीच माझ्या या दिव्याची वात
पाहते दूरच्या अपारतेंत!

अथवा नुरलें वेगळेंपण
अनंत काही जेंत्याचाच कण!
डोंगरदऱ्यांत वाऱ्याची गाणीं
आकाशगंगेत ताऱ्यांचे पाणीं

वसंतवैभव उदार वर्षा
लतांचा फुलोरा
केशरी उषा....प्रेरणा यांतून सृष्टीत स्फुरे
जीवन तेज जें अंतरी झरे
त्यानेच माझिया करी हो दान
गणावे कसे हें क्षुद्र वा सान?
                          ---------कुसुमाग्रज

एकमेकांशिवाय.... मंगेश पाडगावकर.

एकमेकांशिवाय. मंगेश पाडगावकर.

एकामेकांशिवाय
आपण असतो उभे एकमेकांजवळ एकमेकांशिवाय.
तरीही ओळखतो भुकेचा वास.इच्छांचे वळसे.
हिशोब करीत करीत जपुनच घसरतो.
गरजांच्या मिठयांनी गरजाच प्रसवतो.
आणि यातले नसते काहिच आपल्या स्वाधीन.
एकमेकांजवळ. एकमेकांना. एकमेकाने.एकमेकांहून.
एकमेकांआत : एकमेकांशिवाय.

असेच बसतात प्रत्यय स्वार होऊन सगळे उपाशी भाषेवर :
आणि असा चालतो आशयाचा प्रवास.
एकदाच अवलिया भाषेच्या देशातुन परागंदा होतो:
अज्ञात काळोखांतला अचानक पाऊस शब्दहीन एकांतात फांदि होऊन पितो:
त्याला आपण पुरतो : दैनिक पेपरांच्या डोंगर रद्दीखाली.
पों पों पीं पीं ट्रिंग ट्रिंग खट खट हैलो हैलो एकमेकांजवळ.एकमेकाना.एकमेकाहून.एकमेकांआत : एकमेकांशिवाय.

                                                                                               -----मंगेश पाडगावकर.

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०११

कसे न तेव्हा कळ्ले काही (- शांता ज. शेळके)

कसे न तेव्हा कळ्ले काही

की तो होता आवच सार
अनुभुतीच्या आधाराविण
पोकळ नुसता शब्दपसारा !

नव्हती झाडे, नव्हत्या फांद्या
मातीमधली मुळेहि नव्हती,
तरारलेल्या ताठ तुर्‍यांचा
डौल तेवढा होता वरती !

अभाव होता भावशुन्य तो
आत कुणीही नव्हते जागे
नसत्यावरती असत्याचे ते
विणले होते झगमग धागे !


भयाण होते आत रितेपण
आणि अहेतुक होते हेतू,
झिरपत होती अहंभावना
शब्दांशब्दांमधुन परंतु !

मिरवणूक ती वाजतगाजत
गेली जेव्हा दारावरूनी
बघत राहिले, एक हुंदका
असेल कोठे यात इमानी ?

- शांता ज. शेळके



बुधवार, २ फेब्रुवारी, २०११

ग्राफिटी


हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...मंगेश पाडगांवकर


हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो... -मंगेश पाडगांवकर

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...
आपलं जे असतं;
ते आपलं असतं
आपलं जे नसतं;
ते आपलं नसतं
हसतं डोळे पुसुन आतुन फळासारखं पीकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

आलेला मोहोर;
कधी जळुन जातो
फुलांचा बहर;
कधी गळुन जातो
पुन्हा प्रवास सुरु केला, जरी चालुन थकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

कधी आपलं गाव;
आपलं नसतं
कधी आपलं नाव;
आपलं नसतं
अश्या परक्या देशात वाट नाही चुकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

पींजऱ्यात कोंडुन;
पाखरं आपली होत नाहीत
हात बांधुन;
हात गुंफले जात नाहीत
हे मला कळलं तेंव्हा हरुन सुध्दा जींकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

झाड मुकं दीसलं तरी;
गात असतं
न दीसणाऱ्या पावसात;
मन न्हात असतं
कळोखावरं चांदण्याची वेल होऊन झुकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

                     -मंगेश पाडगांवकर. 

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

लळा जिव्हाळा शब्दच खोटे ग. दि. माडगुळकर

लळा जिव्हाळा शब्दच खोटे, माशा मासा खाई
कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही

पिसे, तनसडी, काड्या जमवी, चिमणे बांधी कोटे
दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे
बळावता बळ पंखामधले, पिल्लू उडुनि जाई

रक्तही जेथे सूड साधते, तेथे कसली माया
कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया
सांगायाची नाती सगळी, जो तो अपुले पाही

माणुस करतो प्रेम स्वतःवर, विसरुन जातो देवा
कोण ओळखी उपकाराते, प्रेमा अन् सद्भावा
कोण कुणाचा कशास होतो या जगती उतराई

                                           - ग. दि. माडगुळकर  

--------------------------------------------------------------------------------

शनिवार, २९ जानेवारी, २०११

प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!----मंगेश पाडगांवकर

प्रेमात पडलं की असंच व्हायचं !! - मंगेश पाडगांवकर


माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;

जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं;
अचानक स्वप्नात दिसणं !
खटयाळ पावसात चिंब न्हायचं !
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं !!



केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?
आपण सारखं आठवतो,

प्रत्येक क्षण,
मनात आपल्या साठवतो
ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,

प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो !
आठवणींचं चांदण
असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,

प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिची वाट बघत आपण उभे असतो ...
ठरलेली वेळ कधीच टळलेली !
येरझारा घालणंसुद्धा

शक्य नसतं रस्त्यावर!
सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली !!
माणसं येतात, माणसं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात!
उभे असतो आपण

आपले मोजीत श्वासः
एक तास ! चक्क अगदी एक तास !!
अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते !
अखेर ती उगवते !!

इतकी सहज! इतकी शांत !
चलबिचल मुळीच नाही !
ठरलेल्या वेळेआधीच
आली होती जशी काही !!

मग तिचा मंजुळ प्रश्नः
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तरः
"नुकताच गं ! तुझ्याआधी काही क्षण!"

काळावर मात अशी !
तिच्यासोबत भुलत जायचं!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

एकच वचन
कितीदा देतो आपण !
एकच शपथ कितीदा घेतो आपण !

तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात !
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात !!

साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजूक गत
आपल्या मनात वाजू लागते !!

उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरुन जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं !!

भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!

- मंगेश पाडगांवकर

ग्राफिटी

शुक्रवार, २८ जानेवारी, २०११

No posting today !!


आज दिवसभर कामात व्यस्त असल्यामुळे, Blog वर पोस्टिंग करण्यासाठी वेळ मिळाला नाही.

गुरुवार, २७ जानेवारी, २०११

एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख.. ग.दि. माडगुळकर

एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख

होते कुरुप वेडे, पिल्लू तयात एक.
कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वाहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक.

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी ?
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक.

एके दिनी परंतू, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वार्‍यासवे पळाले.
पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक।

                                                ग.दि. माडगुळकर




पैठनी

पैठनी
फडताळात एक गाठोडे आहे

त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गुढ़ आहे त्यास

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..

माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली

वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
सौभाग्य मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा
                                
                              ----- शांता शेळके
         

--------------------------------------------------------------------------------

विनोद

पोलीस- (कार चालवणाऱ्याला थांबवून) ‘काय राव. भर चौकातून सिग्नल तोडून चाललाय?’ तो- छे हो! सिग्नल पिवळा होत असतानाच पुढे गेलो.. त्याची पत्नी- (बाजूला बसलेली) काहीतरीच काय? चांगला लाल झालेला.. त्यानं पत्नीकडं रागानं बघितलं. पोलीस- तुमचा मागचा इंडिकेटरपण फुटलाय. तो- अरेच्या मला माहीतच नव्हतं ते. पत्नी- अरे, तूच तर सांगितलंस ना मला तो फुटून आठवडा झाला. पण दुरुस्तीला वेळच मिळाला नाही म्हणून! त्यानं पुन्हा तिच्याकडे दात-ओठ खाऊन बघितलं. पोलीस- साहेब आणि तुमचा सीट बेल्ट पण लावलेला नाहीये. तो- आत्ताच तर तुम्ही कार थांबवतांना काढला मी तो. पत्नी- मी तर तुला कधीच सीट बेल्ट लावलेला पाहिला नाही. तो- (पलीकडे खाऊ की गिळू नजरेनं पाहून) बाई गं, तुझं थोबाड बंद ठेव. पोलीस- (तिला) मॅडम, तुमचे मिस्टर असंच बोलतात नेहमी तुमच्याशी? पत्नी- नाही हो, दारूच्या नशेत असला तरच.

मंगळवार, २५ जानेवारी, २०११

ग्राफिटी

पंडीत भीमसेन जोशी

भावपूर्ण श्रध्दांजलि !!
      आपल्या गायनाने आणि संगीताने लक्षावधी संगीत रसिकांचे आयुष्य समृद्ध करणारे जेष्ट गायक पंडित भीमसेन जोशी यांची प्राणज्योत सोमवारी दि. २४/०१/२०११ रोजी पुण्यात मालवली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो !
                                                                                                                              -चारुदत्त.

सोमवार, २४ जानेवारी, २०११

ग्राफिटी


चारोळी ! 
            कितीतरी भेटी जाल्या, नहीं माला बोलता आले,
            भाव माज्या डोळ्यातील नाही तुला वाचता आले,
            जेव्हा जेव्हा समोर आलीस, शब्दच माजे मुके जाले.

शुक्रवार, २१ जानेवारी, २०११

खाली डोकं, वर पाय ! -- मंगेश पाडगावकर

खाली डोकं, वर पाय ! -- मंगेश पाडगावकर


जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
जेव्हा ती लाजत म्हणते, “आज आपण पावसात जायचं”
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, “दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !”
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
                             -- मंगेश पाडगावकर

ग्राफिटी

गुरुवार, २० जानेवारी, २०११

मी तिला विचारलं -मंगेश पाडगांवकर

मी तिला विचारलं -मंगेश पाडगांवकर


मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं........
तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवुन झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती,बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...
ते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..

मी तिला विचारल,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......
मग एक दिवस,
चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरिसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे
मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं


मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......

पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...
तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?



मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं..
 
..... मंगेश पाडगांवकर

सलाम

सलाम


सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणार्‍याला सलाम,
न बघणार्‍याला सलाम,
विकत घेणार्‍याला सलाम,
विकत घेणाचा इषारा करणार्‍याला सलाम,
सलाम,भाई,सबको सलाम.
वटारलेल्या प्रतेक डोळ्याला सलाम,
शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणार्यांना सलाम,
रिकाम्या हातातून ऊद कढणार्‍या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भितीच्या प्रतेक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणार्‍या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणार्‍या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकवणार्‍या
त्याच्या सहेबाला सलाम,
सलाम,प्यारे भाईयों और भैंनो,
सबको सलाम.
ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे,सभांचे
फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणार्‍या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणार्‍या
जादुगारांना सलाम,
भाईयों और भैनों सबको सलाम.
नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट्टीवाल्याला सलाम,
स्मग्लरला सलाम,
मट्‍केवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकरशाहीलाबी सलाम,
सत्तेचा ट्रक चालाविण्यार्‍यांना सलाम,
ट्र्क खाली चिरडलेल्या,
गांडुळांना,कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बँम्ब फेकणर्‍यालंना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्‍यांना सलाम,
कळाबाजारवल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्‍यांना सलाम,
गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्‍यांना सलाम,
तिरडीचे समान विकणार्‍यांना सलाम,
तिरडी उचलणार्‍या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणार्‍या सर्वांना सलाम,
सलाम,प्यारे दोस्तों,सबको सलाम.
बिळांना सलाम,
बिळातल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
पिचलेल्या बयकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम,
गाडीत चेंगरणार्‍या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रोकला सलाम,
धध्यांच्या मलकाला सलाम,
युनीयनच्या लिडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम,
चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणार्‍या
प्रतेक हाताला सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.
या मझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोशणांना सलाम,
जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिरड्यातून सत्तेच पीक कढणार्‍यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखरकारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लोर्‍यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणुकफंडाला सलाम,
अद्रूष्य बुक्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनतीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणार्‍यांना सलाम,
या बातम्या वचाणार्‍या सर्व षंढांना सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.
सत्ता संपत्तीच्या भाडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,
हलकट लाचारांचा देश म्ह्टले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदलेजाणार्‍यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवधर्माविषयी,नेत्यांविषयी वाइट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणार्‍यांचा देश म्हटले
तर नोकरीवरुन कढतील ः
म्हणून आधी मझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या मझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.

Mangesh Padgaonkar


सलाम प्यारे भाइयों और भैनों,सबको सलाम,
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिंन माफ करना भाइयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त ऊजव्या हाताने सलाम,
सलाम,सबको सलाम,
भाइयों और भैनों,सबको सलाम.

(साहित्य अकादमी पुरस्कार १९८० "सलाम" या काव्यसंग्रहास )

------------------मंगेश पाडगांवकर

ग्राफिटी


का ग तु अशी वागतेस?

का ग तु अशी वागतेस?

तुला पाहिलं कि हृदयाची घंटा वाजते.
तुझि उपस्थिति अख्ख्या जगाचं सुख देउन जाते.
तुझ्या बरोबर जगलेले दिवस,
आयुष्याला खुप आठ्वणी देउन जातात.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ..
तुला पाहिलं कि स्वतःला विसरतो,
तुला पाहिलं कि स्वतःला हरवतो,
तुला पाहिलं कि जगच ठेंगन वाटत.
तु प्रत्येक गोष्ट किति सहजतेने समजुन घेतेस ग.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ग.
तुला खुप जाणावस वाटत,
तुला खुप ऒळ्खावस वाटत,
सारख तुझ्या सानिध्यात रहावस वाटत.
सर्वात मिसळून जाण्याचि तुझि ति अदा.........
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ग.
तुझा तो अबोलेपणा, निरागसते चा प्रितिपणा,
मला तुझ वेड लाउन जात.... वेड....
आनंद व्यक्त करणारि तुझी अदा,
जगण्याला महत्व देउन जाते.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ग.
तुझ हसणं, तुझ रुसण,
माझ्या आयुष्याला जणू ऊद्देश देउन जातं.
आयुष्यात जणू तुझीच गरज होती,
अस्सं वाटायला लागतं तुझा विचार जरी मनात आला ना........
तरी गालावर एक गोड्सं हसु देउन जातं.
मग पुन्हा पुन्हा विचारवसं वाटत ग....
का ग तु अशी वागतेस गं....
का ग तु अशी वागतेस गं....

बुधवार, १९ जानेवारी, २०११

सात ..


मानाचा मुजरा !!!
सात वेडात मराठे वीर दौडले सात     "श्रुति धन्य जाहल्या  श्रवुन  आपुली  वार्ता"


    रन सोडूनि  सेनासागर अमुचे  पळता
    अबलाही घरोघर खर्या लाजतिल आता 
भर दिवसा आम्हा दिसू लागली रात
     वेडात मराठे वीर दौडले सात       ते कठोर अक्षर एक एक त्यातील


     जाळीत चालले कनखर ताठर दिल 
     "माघारी वळने नाही मराठी शिल "
विसरला महाशय काय लावता जात  !
वेडात मराठे वीर दौडले सात   
वर भिवयी चढली दात दाबती ओठ 
छातीवर तूटली पटबंधाची गाठ  
डोळ्यात उठे काहुर ओलवे काठ
म्यानातून उसले तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात                   जरी काल  दावली प्रभु गनिमानी पाठ


                   जरी काल विसरलो जरा मराठी जात 
                   हा असा धावतो आज जरी शिबिरात 
        तव मानकरी हा घेउनी शिर करात"
       वेडात मराठे वीर दौडले सात ते फिरता बाजुस डोळे किंचित ओले


सरदार सहा सरसाउनी उठले शेले
रिकिबित टाकले पाय ज़ेलले भाले
उसळले धूळइचे मेघ, निमिषात, 
वेडात मराठे वीर दौडले सात आश्चर्यमुग्ध टाकुनी मागुती सेना 


अपमान बुजाविन्या सात अर्पुंनी माना
छावानीत शिरले थेट भेट गनिमाना 
कोसळल्या उल्का जळt सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात खालून आग, वर आग , आग बाजूनी


समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमनी 
गर्दित लोपले सात जीव ते मानी 
खग सात जाळaले  अभिमानी वणव्यात 
वेडात मराठे वीर दौडले सात 
दगडावर दिसतील अजुन तेथल्या टाचा 
ओढ्यात तरंगे अजुन रंग रक्ताचा 
क्षितिजावर उठतो अजुन मेघ मातीचा 
 अध्याप वीरानी कुणी वार्यावर गात 
वेडात मराठे वीर दौडले सात







                               कुसुमाग्रज


 





मंगळवार, १८ जानेवारी, २०११

कविता

कविता



कित्ती सहज बोल तुझे पण अर्थ ’आत’ पोहचले नाही
निरोप घेऊनी तू गेला पुढती,पाऊल माझे हलले नाही
रंगलेले सारे डाव अपुले,फिस्कटलेले तू निमूट पाहिले
कोण नियती,कसले प्राक्तन?तू डाव पुन: रचले नाही
होता येईल रे तुला दगड,जखमांनाही शिवता येईल
नेत्रांमधल्या लक्ष सागरी,किनारे मज गवसले नाही
स्वप्नबीजं तू रुजवत गेलास,तरुतळी निवांत निजलास
वणवण माझी रक्तपाऊले,ऊन माथ्यावरले हटले नाही
उदक पसाभर मधुर मीलनाचे,’जपून ठेव’ सांगून गेलास
अंतिम घटकेस,गंगाजल कशी घेऊ हाती?कळले नाही
एके काळचा ’हमराही’ म्हणूनी गेला..’अल्विदा राही’
विरहाचे घट्ट विळखे देही,प्राण जीवात उरले नाही..

मंगळवार, ११ जानेवारी, २०११

आठवणीच आयुष्यं भर साथ देतात

आठवणीच आयुष्यं भर साथ देतात
खरं तर आठवणीच आयुष्यं भर साथ देतात
माणसे मात्र नुसतीच सोबत करतात......
आठवणींना साठवून हसता येतं, रडता येतं
सोबतच्या माणसांना याचं सोयरं सूतक ही नसतं.....
त्या मनाच्या खोल कप्प्यात दडवता येतात
निवांतात मग त्या हळूच पापणी उघडतात......
हिशेब नसतो आठवणी किती जमतात
अनेकदा उलगडल्या तरी हव्याच असतात........ .




सोमवार, १० जानेवारी, २०११

आचार्य अत्रे..

आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते.

मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी कॉन्ग्रेसचे संख्याबळ जास्त होते.
अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवित असत.
अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असतांना पत्रकारांनी त्यांना विचारले ,
' अत्रेसाहेब तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता
पण त्यांच्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार ? ''
बाजूच्या शेतातील बळवंतरावांना अत्र्यांनी विचारले ,
'' बळवंतराव कोंबड्या पाळता की नाही ? ''
'' तर . चांगल्या शंभर कोंबड्या हायेत की ! ''
'' आणि कोंबडे किती ?''
'' फक्त एक हाये ''
'' एकटा पुरतो ना ?''
उपस्थितांमध्ये प्रचंड हंशा उसळला
पत्रकारही त्या हंशात सामील झाले.
                          आचार्य अत्रे ..
(  याना संयुक्त महाराष्ट्र संग्राममधे आग ओकनारी तोफ!! असे संभोधले जायचे .. )

हजर जबाबी अत्रे !

हजर जबाबी अत्रे !

अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते पायी पायी कामासाठी जात

होते.
तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला त्याने खवचटपणें विचारले
' काय बाबूराव आज पायी पायी , काय कार विकली की काय ?'
अत्रे म्हणाले. ' अरे आज तुम्ही एकटेच ? वहिनी दिसत नाही बरोबर ?
कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय ?

रविवार, ९ जानेवारी, २०११

कविता -!! बालपणात जायचयं !!

!! बालपणात जायचयं !! 
देवा मला परत बालपणात जायचयं,
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं......
पुरणाच्या पोळीसोबत,
आईचं प्रेम होतं,
जखमेचं माझ्या,
काळजावर तिच्या व्रणं होतं
देवा मला परत बालपणात
जायचयंआनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!१!!
शाळेत काही चुकलं तर्‌,
सरांची छडी होती,
’तिच्या’ समोर नाही मारलं,म्हणुन
मनात आनंदाची गुढी होती
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!२!!
चांदण एकटक पाहण्यासाठी,
निरभ्र मोकळं आकाश होतं,
अन्‌ भरपूर खेळण्यासाठी,
उजाडं असं रान्‌ होतं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!३!!
बाबांच्या मारापुढे,
बत्ती माझी गुल होती,
अन्‌, आसू आईचे नकोत, म्हणुन
हास्यकळी माझी सदा फ़ुलत होती
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!४!!
लहान भावाचं,
कायमच मागं राहणं,
अन्‌ तो मागे का? म्हणून,
आईच मलाच दम देणं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!५!!
तेव्हा मला खरचं,
काही नाही कळायचं,
जसा छंदच मला,

विनाकारण भांडायच,
भांडलेल्या सर्वानाचं,
सॉरी म्हणुन यायचयं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!६!!

मैत्रीण तेव्हाही एक ,
चांगली भेटली होती,
पक्की मैत्री होण्याआधीच ,
’ती’ कुठे बर हरवली होती,
एकदाच तिला फ़क्त, Hi म्हणुन
सरप्राईज द्यायचयं,

निखळ तिचं हसु,
डोळ्यात साठवून घ्यायचयं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं 

सूचना :- प्रस्तुत कविता ह्या ब्लॉग प्रकाशाकाचा नसून, त्या निव्वळ  संग्रहासाठी आणि वाचकांच्या मनोरंजनासाठी आहेत .

विनोद


एक कासव मुंबईच्या रस्त्यावरून चालले असताना, गोगलगायींच्या कळपाने त्याच्यावर हल्ला केल्या व त्या पळून गेल्या. अर्धमेले कासव पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदवायला गेले. तिथल्या ऑफिसरने त्याला विचारले, ‘‘हे सगळे झाले तरी कसे, नीट सांगा.’’ कासव म्हणाले, ‘‘इतक्या वेगात सगळे झाले की, मला काही कळलेच नाही.’’ (तर तुम्हाला सांगणार काय कप्पाऽऽळ!) 

शनिवार, ८ जानेवारी, २०११

  शोधा - Google

चारोळी - नेहमीच वाटत


नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं आणि मिठीत विसावताना तुला जगाचं भान नसावं नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं बरसणाऱ्या पाऊसधाराना दोघांच्या ओंजळीत...

चुटकुला


मुन्नाभाई- अरे सर्किट, आज तर जान्हवी समोर अपुन की वाट लग गई. सर्किट- क्या हुआ मुन्नाभाई? मुन्नाभाई- ती म्हणाली, की अपुन के एंगेजमेण्ट पर तू मला रिंग देणार ना, तर मी म्हणालो, आई शपथ रिंग देणार; पण तू बोल रिंग लॅण्डलाइनवर देऊ का मोबाईलवर!

EKDA BUS MADHE

EKDA BUS MADHE 
एक सुंदर गोड अप्सरा मला दिसली
CONDUCTOR च्या सीट वर ती
कोप-यात एकटीच होती बसली
मोकळी जागा पाहुन मी
माझी "तशरिफ" तेथेच ठेवली
मला पाहताक्षणीच तिने
आपली पर्सच उचलुन ठेवली
उघडया खिडकितुन वारा
तसा फ़ारच जोरात येत होता
तिच्या ओढनीला माझ्या चेह-यावर
हळुवार उडवीत होता
ती मात्र ओढनी सावरत सावरत
स्वत:शीच गुनगुनत होती
नकळत दोघातील अंतर कमी करन्यासाठी
मला हाथभार लावत होती
बसमधला प्रत्येक प्रवासी
आमच्याकडेच बघत होता
मी तेथुन केव्हा उठेल
बहुतेक याचीच वाट पहात होता
तेवढ्यात बसच्या धक्क्याने
आमच्या दोघांतील अंतर कमी केले
एका मिनीटासाठी का होईना
मला स्वप्नाच्या दुणियेत नेले
मग दुस-या धक्क्यालाच मी
स्वप्नातुन बाहेर आलो
एक मिनिटातच तिच्यासमवेत
बरीच काही लाईफ़ जगुन गेलो
येवढ्यात CONDUCTOR माझ्याजवळ आला
लेडिज सीट सांगुन मला उठवुन गेला
तेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला
स्वप्नाचा माझ्या त्याने चुराडाच केला
मग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी
ती तीची PURSE सावरायला लागली
गर्दित मला खेटत खेटत
स्वत:ची वाट काढु लागली
खाली उतरताच माझी नजर
एकटक तिला शोधु लागली
ती मात्र BOYFRIEND च्या गाडीवर बसुन
केव्हाचीच हवेशी बोलु लागली
आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते
आम्हाला आवडलेली रानी
जेव्हा तेव्हा "ENGAGE" च असते

कधीतरी असेही जगून बघा....
कधीतरी असेही जगून बघा.....
माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
"किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....
संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....
वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा.....
प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!

शुक्रवार, ७ जानेवारी, २०११

कधी कोणी समजू शकतो का या मुलींना?

कधी कोणी समजू शकतो का या मुलींना? 
समजून सगळे
नासमज बनतात मुली
चांगल्या चांगल्या मुलांना
वेडयात काढतात या मुली
अनोलखी पुरुषाला
दादा - भैय्या म्हणतात या मुली ,
पण आपल्याच वडलान्ना
काका का म्हणतात या मुली ,
बोलायला गेलो तर
लाइन मारतोय म्हणतात या मुली,
मग नाहीच बोललो की
शाइन मारतोय का म्हणतात या मुली?
मुद्द्याच बोलण थोड़च असत
तरी चिव चिव चिव चिव खुप करतात या मुली,
जेव्हा खरज बोलण्याची गरज असते ....

तेव्हा नजर खाली करून रुमाल का ख़राब करतात या मुली ?
पावसात भिजायच तर असत
तरी चिखल पाहून नाक का मुरडतात मुली ?
थंडी गुलाबीच चांगली अस म्हणतात!!!
मग 2-4 स्वेटर घालून सुद्धा कुडकुडतात का या मुली ??
वाचून ही कविता
चान्ग्ल्याच भडकतिल या मुली !!!!!
मग (कदाचित) विचार करून मनात...
थोड़ तरी बरोबर आहे महणतील या मुली ...