!! बालपणात जायचयं !!
देवा मला परत बालपणात जायचयं,
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं......
पुरणाच्या पोळीसोबत,
आईचं प्रेम होतं,
जखमेचं माझ्या,
काळजावर तिच्या व्रणं होतं
देवा मला परत बालपणात
जायचयंआनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!१!!
शाळेत काही चुकलं तर्,
सरांची छडी होती,
’तिच्या’ समोर नाही मारलं,म्हणुन
मनात आनंदाची गुढी होती
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!२!!
चांदण एकटक पाहण्यासाठी,
निरभ्र मोकळं आकाश होतं,
अन् भरपूर खेळण्यासाठी,
उजाडं असं रान् होतं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!३!!
बाबांच्या मारापुढे,
बत्ती माझी गुल होती,
अन्, आसू आईचे नकोत, म्हणुन
हास्यकळी माझी सदा फ़ुलत होती
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!४!!
लहान भावाचं,
कायमच मागं राहणं,
अन् तो मागे का? म्हणून,
आईच मलाच दम देणं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!५!!
तेव्हा मला खरचं,
काही नाही कळायचं,
जसा छंदच मला,
विनाकारण भांडायच,
भांडलेल्या सर्वानाचं,
सॉरी म्हणुन यायचयं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!६!!
मैत्रीण तेव्हाही एक ,
चांगली भेटली होती,
पक्की मैत्री होण्याआधीच ,
’ती’ कुठे बर हरवली होती,
एकदाच तिला फ़क्त, Hi म्हणुन
सरप्राईज द्यायचयं,
निखळ तिचं हसु,
डोळ्यात साठवून घ्यायचयं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं
सूचना :- प्रस्तुत कविता ह्या ब्लॉग प्रकाशाकाचा नसून, त्या निव्वळ संग्रहासाठी आणि वाचकांच्या मनोरंजनासाठी आहेत .
अर्थातच मराठी भाषा हि माझी मातृभाषा असल्यामुळे , मराठील उत्कृष्ट लेखन,कथा,कादंबरी,कविता,चारोळ्या,आचार,विचार एकत्र मांडण्याचा प्रयत्न .... सूचना :- सर्व कवी,लेखकांची माफी मागून ....ब्लॉगवर प्रस्तुत केलेली प्रत्येक कविता,गद्य,पद्य,उतारा हे ब्लॉग प्रशासकाचे असेलच असे नाही,इतर मराठी वेब किंवा ब्लॉग वरील सूद्धा असू शकते, हि फक्त मराठी साहित्याची आवड जपण्याची धडपड !! धन्यवाद. चारुदत्त पाटील.
रविवार, ९ जानेवारी, २०११
विनोद
एक कासव मुंबईच्या रस्त्यावरून चालले असताना, गोगलगायींच्या कळपाने त्याच्यावर हल्ला केल्या व त्या पळून गेल्या. अर्धमेले कासव पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदवायला गेले. तिथल्या ऑफिसरने त्याला विचारले, ‘‘हे सगळे झाले तरी कसे, नीट सांगा.’’ कासव म्हणाले, ‘‘इतक्या वेगात सगळे झाले की, मला काही कळलेच नाही.’’ (तर तुम्हाला सांगणार काय कप्पाऽऽळ!)
शनिवार, ८ जानेवारी, २०११
चारोळी - नेहमीच वाटत
नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं आणि मिठीत विसावताना तुला जगाचं भान नसावं नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं बरसणाऱ्या पाऊसधाराना दोघांच्या ओंजळीत...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)